A minor girl has been raped and made her pregnant 
बातम्या

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून केले गर्भवती; अवैधरित्या गर्भपातही केला ! 

संजय डाफ, सायली खांडेकर

नंदुरबार :- नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील साबलापाणी येथील एक आदिवासी कुटुंब ब्राह्मणपुरी येथे शेती कामानिमित्त मजुरीसाठी आले होते. या परिवारातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ब्राह्मणपुरी येथील एका युवकाने जोर जबरदस्ती करून वारंवार शारीरिक अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यावर केलेले पाप लपवण्यासाठी अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाच महिन्याचा गर्भपात Abortion घडवून आणला आहे. A minor girl has been raped and made her pregnant

भ्रूणहत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भपात करण्यासाठी गावातील उच्चभ्रू समाजातील व्यक्तीने मध्यस्थता  केली. ओळखीच्या डॉक्टर व नर्सच्या मदतीने मध्यप्रदेशातील खेतिया येथील एका शेतात नेऊन अनधिकृतरित्या गर्भपात घडवून आणला. तसेच सदर घटनेची बाहेर कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पीडित मुलीला देण्यात आली होती.

सदर प्रकरणात पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी तातडीने कारवाई केली आहे. या घटनेला कारणीभूत मुख्य सूत्रधार पंकज मंगा पाटील, अंबालाल पटेल, शांत्या पाटील, भुऱ्या शांत्या पाटील अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक डॉक्टर व एक नर्स फरार आहेत. डॉक्टर् व नर्स यांचा तपास सुरू आहे.

वैद्यकीय सेवेला काळीमा फासणारे हे कोण ? याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर गुन्ह्याची भा .द .वि. कलम 376, 376AB, 313, 318, 506, 34 प्रमाणे व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण, अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शहादा पो.स्टे. येथे नोंद करण्यात आली आहे. पोक्सो POSCO कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे देखील पहा- 

गर्भपात करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेला कारणीभूत नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी व ही केस न्यायालयात चालविण्यात यावी अशा विविध मागण्या जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी केल्या आहेत. या घटनेमुळे पीडित अल्पवयीन आदिवासी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  क्रूर कृत्य करणाऱ्या जबाबदार नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच इतर सहआरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनांकडून देण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: 'तू माझ्याशी बोलली नाही तर...', रस्ता अडवत शाळकरी मुलीचा विनयभंग, कुटुंबीयांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Live News Update : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू

Paneer Thecha Recipe: मलायका अरोराची आवडती डिश; पनीर ठेचा बनवण्याची सोपी पद्धत नोट करा

Mira Road Protest: मीरा रोडमध्ये हायव्होलटेज ड्रामा; मनसे नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात|VIDEO

Kej Crime News : बोलली नाहीस तर आत्महत्या करीन, तुझ्या आई- वडिलांनाही मारीन; धमकावत शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

SCROLL FOR NEXT