बातम्या

सर्वाधिक कमाई करणाऱ्या  जगभरातील अभिनेत्यांची यादी जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - औद्योगिक मासिक ‘फोर्ब्स’ने २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या  जगभरातील अभिनेत्यांची यादी जाहीर केली असून, त्या यादीत अक्षयकुमारचे नाव सलग दुसऱ्या वर्षी चमकले आहे. ‘खिलाडी’ अक्षयने ‘ऍव्हेंजर्स’चे ख्रिस इव्हान्स, पॉल रूड आणि विल स्मिथ यांच्यावर मात करीत यादीत चौथा क्रमांक पटकाविला आहे. 

‘फोर्ब्स’च्या नोंदीनुसार १ जून २०१८ पासून १ जून २०१९ या काळात अक्षयची कमाई सुमारे ६ कोटी ५० लाख डॉलर (४६५ कोटी रुपये) होती. गेल्या वर्षी बॉलिवूड स्टार सलमान खान यानेही जगातील सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले होते. या वर्षी मात्र सलमान खान यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. हॉलिवूडमधील निर्माता आणि ‘बेवॉच’चा अभिनेता ड्‌वेन जॉन्सनने कमाईत बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस हेम्सवर्थ याचे नाव आहे.

‘माव्हर्ल्स’च्या कलाकारांपैकी एक असलेल्या ख्रिसची कमाई सात कोटी ६४ लाख डॉलर आहे. ‘थोर’चा नायक रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हा तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: Akshaykumar Income Fourth Rank

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT