In the market of Bahubali, Katappa and Shivgamidevi Bhandara 
बातम्या

बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात

दिनेस पिसाट

भंडारा - भंडारा जिल्हाची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणुन आहे. जिल्ह्यात 99 टक्के शेतकरी धान पिकांची लागवड करतात. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला असून बी-बियाने खरेदीसाठी कृषि केन्द्रावर गर्दी करीत आहे. 

यावर्षी मात्र बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून व विचित्र नावे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अलीकडेच दक्षिण भारतात (South India) प्रदर्शित होऊन देशभरात सुप्रसिद्ध झालेल्या बाहुबली या सिनेमावरून (Bahubali Movie) धानाच्या बारीक स्वरूपाच्या बियानाला एका खासगी कंपनीने "बाहुबली" (Bahubali)हे नाव दिले आहे.  

हे देखील पहा - 

सोबतच बाहुबली सिनेमातून प्रसिद्ध झालेला बाहुबलीचा मामा "कटप्पा" (Katappa)याचेही नाव एका ठोकळ धानाच्या बियाणाच्या वानाला देण्यात आले आहे. तसेच एका कंपनीने तर बाहुबलीची आई "शिवगामीदेवी" (Shivgami Devi) असे नाव बियाणांना देण्यात आले आहे. बाजारात आलेल्या धानाच्या बियाणांपैकी बाहुबली, कटप्पा, शिवगामीने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहे. 

त्यामुळे आता जिल्ह्यात या धानाच्या वाण ( बियाने ) स्टॉक ही सांपला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ह्या अफलातून नावाच्या वान पिकांच्या धानाची लागवड करत आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी नावाचा  तांदूळ भविष्यात खायला मिळणार आहे अशी माहिती रेणुका कृषी केंद्राचे मालक यांनी दिली आहे.  

भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकरी खरिपाच्या (kharif crops)खरीपधान पेरणीच्या लगबगीत लागला असून पेरणीची पूर्वतयारी म्हणून शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी वखरणी, नांगरणी करून ठेवत आहे. यासर्व तयारी सोबतच शेतकरी बियाणांच्या दुकानामध्ये गर्दी करत असून योग्य बियाणे (Seeds) निवडून धानाची लागवड करत असतांना बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून व विचित्र नावे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे आता आपल्या सुप्रसिद्ध चित्रपटातील कॅरेक्टर बियाणे रुपात मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी खरेदीसाठी कृषि केंद्रावर गर्दी करीत आहे. 

धान्याची नावे जरी आकर्षक असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांचा किंमतीमध्ये 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत तसेच काही वानांमध्ये ही वाढ  झालेली आहे. इंधनाचे वाढलेले दर (Increased fuel rates)आणि त्यामुळे वाढलेला वाहतूक खर्च (Increased transportation costs) यामुळे बियाणांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. बियाणांची अशी प्रसिद्ध व अफलातून नावे शेतकऱ्यांना मात्र आपल्याकडे आकर्षित करत आहे. असे बाजारपेठांमध्ये आढळून आले आहे. 

Edited By - Puja Bonkile 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT