बातम्या

नात आणि जावयासह शरद पवारांनी केले मुंबईत मतदान : Loksabha 2019

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते. 

पवार यांनी चार एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत राज्यात प्रचाराचा धुमधडाका लावला. मोदी सरकारला हरविण्यासाठी मी चार एप्रिलपासून घर सोडल्याचे ते प्रचारात सांगत होते.  निवडणूक दौऱ्यात 27 एप्रिलपर्यंत 79 सभा त्यांनी घेतल्या. प्रचार संपल्यानंतर काल 28 एप्रिल रोजी एक दिवस ते दौऱ्यातून त्यांनी विश्रांती घेतली. तरी आज मतदान होणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील स्थितीचा आढावा ते काल उशिरापर्यंत घेत होते. आज सकाळी  मतदान करून ते सोलापूर आणि उस्मानाबादच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. 

मतदानानंतर शरद पवार म्हणाले, की देशाच्या हिताचा विचार करून मतदानाचा हक्क बजावला. मुंबईकर कशात मागे नसतात, त्यामुळे मतदानातही राहणार नाहीत. सर्व मतदार मतदानाचा हक्क बजावतील. लोक निर्णायक मतदान करतील अशी अपेक्षा आहे. मला मावळसह सर्व मतदारसंघातील निवडणूक महत्त्वाची आहे. मी राहुल गांधी यांच्यावर विचारलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर वेगळ्या पद्धतीने दाखविण्यात आले.

प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीची भीषण दाहकता लोक पवार यांना सांगत होते. परिस्थितीची पाहणी करायला मी येईन असं आश्वासन साहेबांनी त्यांना दिलं होतं. आज मतदान झाल्यावर जराही न थांबता ते सोलापूर आणि उस्मानाबादच्या दुष्काळी दौऱ्यावर रवाना झाले, अशी माहिती राष्ट्वादीच्या प्रवक्त्यांनी दिली.

Web Title: NCP chief Sharad Pawar casts vote in Mumbai for Loksabha election

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

Pet Care in Summer: उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना 'या' पद्धतीनं ठेवा हायड्रेटेड

Sanju Samson Statement: इथंच राजस्थान रॉयल्सकडून चूक झाली; संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण

कोल्हापूर : गाेव्याला निघालेल्या खासगी बसनं महिलेस चिरडलं, घटनास्थळी उसळली मोठी गर्दी

Vladimir Putin : पुतीन बनले पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष; शपथ घेताच पाश्चिमात्य देश आणि युद्धावर केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT