बातम्या

'रोहित दादांना तिकीट द्या', शरद पवार यांच्याकडे जामखेड येथील गावकऱ्यांनी केली मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क

जामखेडः 'रोहित दादांना तिकीट द्या ते नक्की निवडून येतील', अशी मागणी जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या गावकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर हसून रोहित तुझी मागणी झाली बघ असं शरद पवार रोहित पवार यांना म्हटले.

सध्या जामखेड मतदारसंघात भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. गावकऱ्यांनी केलेली मागणी शरद पवारांनी मान्य केली आणि रोहित पवार यांनी जामखेडमधून लढण्याची तयारी दाखवली तर जामखेडमध्ये राम शिंदे विरूद्ध रोहित पवार असा सामना विधानसभेच्या वेळी पहायला मिळू शकतो. शरद पवार आणि रोहित पवार हे जामखेडमध्ये आहेत. तेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यावर शरद पवारांनी दुष्काळ असताना स्वागत कसलं करता? तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा असं म्हटलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील रणधुमाळी संपल्यानंतर शरद पवारांनी राज्याचा दुष्काळी दौरा सुरू केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवारही आहेत. रोहित पवार आणि शरद पवार हे सध्या एकत्र महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील दौऱ्यावर आहेत.

Web Title: Villagers Demands Rohit Pawars Nomination For Assembly Election To Sharad Pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबई उत्तरसाठी तेजस्वी घोसाळकर यांचा काँग्रेसकडून लढण्यास नकार?

India Vs Bangladesh: टीम इंडियाची विजयी सलामी! बांगलादेशवर ४४ धावांनी शानदार विजय

Today's Gold Silver Rate : लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील दर

Devendra Fadnavis: रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

Will Jacks Record: १० चेंडूत ५० धावा.. विल जॅक्सने मोडला युनिव्हर्स बॉसचा मोठा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT