Devendra Fadnavis: रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

Maharashtra Political News: रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Criticized Uddhav ThackeraySaam Tv

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray

रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. मोदीजींनी केलेला विकास संपूर्ण देश पाहतो आहे. तुम्ही केलेलं विकासाचं एकतरी काम दाखवा, असं चॅलेंजही फडणवीसांनी ठाकरेंना दिलं आहे. सोलापूर येथे माध्यमांसोबत बोलत होते.

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray
Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, विकासाला नाही. त्यामुळे जनतेने जागरूक राहावे, असं उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत म्हटलं होतं. मोदी मतांसाठी राम-राम करत फिरत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार केला होता. देवेंद्र फडणवीस हल्ली भाजपा उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागले आहेत. पण मी सांगतो. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे, असंही ठाकरे म्हणाले होते.

"तुम्ही केलेलं विकासाचं एकतरी काम दाखवा"

"मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतो. तुम्ही केलंलं एकही विकासाचं काम दाखवा. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले, एक तरी विकासाचं काम दाखवा. आयुष्यात त्यांनी काही विकासाचं काम केलं नाही. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्यासारखं आहे", असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

रामराम भारतात नाही तर पाकिस्तानात करायचा का?

"आम्ही रामराम केल्याचा एवढा राग शिवसेनेला का आहे. भारतात रामराम करायचा नाही मग काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचा. आम्ही रामराम करणारच. त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणे सुरू केले असेल तर आम्ही मात्र रामरामच करणार", असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम भाजपने केलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना "संजय राऊत कोण आहेत माहीत नाही. असं कुणी म्हणत असेल तर ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र आहे", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray
Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com