Will Jacks Record: १० चेंडूत ५० धावा.. विल जॅक्सने मोडला युनिव्हर्स बॉसचा मोठा रेकॉर्ड

GT vs RCB, Will Jacks Record: या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील फलंदाज विल जॅक्सने शानदार शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने ख्रिस गेलचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
Will jacks created big record in ipl breaks the universe boss chris gayle record amd2000
Will jacks created big record in ipl breaks the universe boss chris gayle record amd2000twitter

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघाला ९ गडी राखून ४ षटक शिल्लक ठेऊन सामना जिंकला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अशी काही तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या विल जॅक्सने चौकार षटकारांचा पाऊस पाडत वादळी खेळी केली. त्याने ४१ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १० षटकार ५ चौकार खेचले.

विल जॅक्सचं वादळी शतक..

विल जॅक्सने ३१ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ज्यावेळी त्याने अर्धशतक झळकावलं त्यावेळी विराट कोहली ६९ धावांवर फलंदाजी करत होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ विजयाच्या अगदी जवळ होता. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने अचानक पाचवा गियर टाकला आणि धावांची गाडी सुसाट पळवली. ३१ चेंडूत ५० आणि ४१ चेंडूंमध्ये त्याने आपलं शतक साजरं केलं. म्हणजे त्याने केवळ १० चेंडूंमध्ये ५० धावा पूर्ण केल्या.ipl

Will jacks created big record in ipl breaks the universe boss chris gayle record amd2000
MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

या शतकी खेळीसह त्याने ख्रिस गेलचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विल जॅक्सने ६ वाजून ४१ व्या मिनिटाला आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ६ वाजून ४७ व्या मिनिटाला त्याने आपलं शतक पूर्ण केलं. म्हणजे अवघ्या ६ मिनिटात त्याने आपलं शतक पूर्ण केलं.

Will jacks created big record in ipl breaks the universe boss chris gayle record amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

यासह सर्वात कमी चेंडू खेळून ५० ते १०० धावांचा पल्ला गाठणारा तो आयपीएल स्पर्धेतील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने १० चेंडूत ५० धावा केल्या. तर ख्रिस गेलने १३ चेंडूंचा सामना करत ५० ते १०० धावांचा पल्ला गाठला होता. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने १४ चेंडूंचा सामना करत ५० ते १०० धावांचा प्रवास पूर्ण केला होता. मुख्य बाब म्हणजे या यादीत समाविष्ट असलेले तिन्ही खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील आहेत.

गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची खेळी केली. यापूर्वी विराटने देखील ५० ते १०० धावांचा पल्ला अवघ्या १४ चेंडूत गाठला होता. विल जॅक्सच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, विल जॅक्सने १७ चेंडूत १७ धावा करत संथ खेळी केली होती. त्यानंतर त्याने अवघ्या २४ चेंडूंचा सामना करत ८४ धावा चोपल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com