बातम्या

राज्यात कोरोना रुग्णांनी गाठला 5 हजारांचा आकडा, तर एकाच दिवशी 150 रुग्ण बरे झाले...

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा गाठलाय. मंगळवारी राज्यात ५५२ नवे कोरोना रुग्ण सापडले असून राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार २१८ वर गेलाय. काल दिवसभरात तब्बल १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर १९ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालाय. राज्यात आत्तापर्यंत ७२२ रुग्ण बरे झालेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता २५१ झाली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Web Title - marathi news there is more than 5 thausands corona patients in maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT