बातम्या

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का.. 

सकाळ न्यूज नेटवर्क

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवून टीम इंडियानं मिशन वर्ल्ड कपला दिमाखात सुरूवात केलीय. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात तर बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये भारतीय संघानं सरस कामगिरी केली. मात्र वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला धक्का बसलोय तो ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यातील शतकवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानं. 

शिखरनं या सामन्यात 117 धावांची खेळी खेळली होती. याच खेळीदरम्यान नाथन कुल्टरचा एक उसळता चेंडू त्याच्या हातावर आदळला होता. त्यामुळं त्याच्या अंगठ्याला मार लागला. त्याची पर्वा न करता त्या सामन्यात शिखरनं धडाकेबाज शतक ठोकलं. सामन्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं त्याला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे. 

रोहित सोबत सलामीला कोण उतरणार ? 

न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरोधातील सामन्यांना शिखर मुकणार आहे. शिखरच्या अनुपस्थितीत के.एल.राहुल रोहित शर्मासोबत सलामीला उतरणार आहे. के.एल.राहुल आतापर्यंत चौथ्या स्थानी फलंदाजीला येत होता. आता न्यूझीलंडविरोधातील सामन्यात चौथ्या स्थानी विजय शंकर की दिनेश कार्तिकला संधी मिळतेय याबाबत उत्सुकता आहे.

WebTitle : marathi news shikhar dhawan injured wont be able to play for three weeks 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

SCROLL FOR NEXT