बातम्या

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांनाच ; अजित पवारांचे संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क

कऱ्हाड - साताऱ्यातील मनोमिलनाबाबत वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राजांना एका गाडीत घातले आहे. त्यांचा पहिला गिअर पडला आहे. लवकरच दुसरा, तिसरा, चौथाही गिअर पडेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांनाच असेल, असे संकेत दिले.

कऱ्हाडात राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्षात गटबाजी असते. मात्र, राष्ट्रवादीत सर्वोच्च नेते शरद पवार हे अंतिम निर्णय देतात, तो मानून सर्व जण कामाला लागतात. हे आजपर्यंतचे चित्र असून लोकसभेच्या निमित्ताने तेच चित्र राज्यात पाहायला मिळेल.’’
सर्व अधिकार कमी केल्याने लग्नपत्रिकेत प्रेषक म्हणून पंचायत समिती सभापती, उपसभापती किंवा सदस्य आदी पदे टाकण्यासाठीच राहिल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘राज्यातील जनतेने संधी दिल्यास हे प्रश्‍न सोडवण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याची ओळख आहे. ज्येष्ठ नेते पवार यांच्यावर प्रेम करणारा हा जिल्हा आहे.

राज्याचे कृषिमंत्रीपद महत्त्वाचे असून, अद्यापपर्यंत ते भरलेले नाही. एमपीएससीचे अध्यक्षपद हे प्रभारी आहे. महत्त्वाच्या जागा रिक्त ठेवल्यात. एफआरपीचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे, अजूनही दिला जात नाही, हे सरकारला कळत नाही का? बॅंका किती पैसे देतात, किती रक्कम कमी पडते? २९०० रुपयांचा दर ३४०० रुपये केला, तर सर्वच प्रश्‍न निकाली निघेल. त्यासाठी विविध संघटना आंदोलन करत आहेत. १०० दिवस झाले तरी एफआरपी दिली जात नाही.’’ 

मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला सत्ता दिली. गट-तट न बघता राष्ट्रवादीनेही त्यासाठी सहकार्य केले. मात्र अलीकडच्या काळात भाजपकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून निवडणुका लढवल्या जातात, अशी टीका त्यांनी केली. भाजपमध्ये पूर्वीचे काहीच राहिले नसल्याचे सांगून सत्तेसाठी व संस्था आणण्यासाठी ओवाळून टाकलेली लोक ते घेतात. त्यांच्या पक्षात गेलेली व्यक्ती स्वच्छ, निर्मळ चांगल्या मनाची होते. तोच दुसरीकडे असला की टाकाऊ होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.   

पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अजित पवार म्हणाले, ‘‘लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाचा निर्णय असतो. अजून उमेदवार जाहीर केले नाहीत. दोन्ही काँग्रेससह मित्रपक्ष लोकसभा लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे चित्र स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादीचे अंतिम उमेदवार जाहीर होतील. माढ्यात पक्षांतर्गत धूसही नाही अन्‌ फूसही नाही. आपण काही काळजी करू नका.’’

या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

Goa Airport News Today: गोवा विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी आल्यानं खळबळ

Benifits of Buttermilk: अ‍ॅसिडिटी, गॅस सारख्या समस्यांसाठी 'या' पेयाचे सेवन ठरेल गुणकारी

Today's Marathi News Live : मालवणी दारुकांड प्रकरणी ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता

Broccoli Benefits: ब्रोकोली खाताय? फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT