बातम्या

'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था सकाळ माध्यम समुहाने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे 'सकाळ'चे सर्व दिवाळी अंक अॅमेझॉन डॉट इनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाले आहेत. 

जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून तुमच्या-आमच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्लेनषण आणि अनुभवसंपन्न विचार "शब्ददीप', "अॅग्रोवन', "सकाळ साप्ताहिक', "तनिष्का' आणि "प्रीमिअर' या दिवाळी अंकांमध्ये आहेत; शिवाय "सकाळ माध्यम समूहा'ने यंदा वाचकांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे. ती म्हणजे "सरकारनामा' या राजकीय विशेषांकाची! ​

राजकीय महासर्वेक्षणः सरकारनामा 

सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी "सरकारनामा' ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी "सरकारनामा'च्या दिवाळी अंकामध्ये आहे. 2019 मध्ये हुकूमाचा एक्का कोण ठरणार, या बद्दल जनतेच्या मनातील महासर्वेक्षणही अंकामध्ये प्रसिद्ध होईल.​

माणसांच्या गोष्टीः शब्ददीप

सध्याच्या सामाजिक घुसळण बघता डावीकडून उजवीकडे नेमका काय आहे भारत ? हे उलगडणारा परिसंवाद 'आयडिया ऑफ इंडिया' हे शब्ददीपचे विशेष आकर्षण असेल. त्याचबरोबर लेहपासून केरळपर्यंतच्या प्रवासामध्ये भेटलेली भन्नाट माणसं आणि त्यांच्या अफलातून कथा यांचे रिपोर्ताज या दिवाळी अंकात असतील. राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणीही अंकात आहेत. 

प्रश्नांची उत्तरेः अॅग्रोवन

शेतीतील समस्यांवर सकारात्मक मार्ग काढणाऱ्यांच्या यशोगाथांनी "अॅग्रोवन'चा दिवाळी अंक सजलेला आहे. मजूर समस्येवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा अंकात आहेत. शिवाय, कृषी क्षेत्रातील नवनवे शोध, बदलणारी शेती यावरही मौलिक विचारधन या अंकात आहेच. ​

सकाळ साप्ताहिक, तनिष्का आणि प्रिमीयर

याशिवाय, आयुष्य बदलून टाकणारे अनवट प्रवास आपल्या भेटीस येणार आहेत "सकाळ साप्ताहिक'मधून, तर खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटांची कहाणी असेल "तनिष्का'मध्ये..! मनोरंजनाच्या दुनियेतील बित्तंबातमी घेऊन, त्याजोडीला स्टार्स आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येत आहे "प्रीमिअर' हा दिवाळी अंक.. 

हे सर्व अंक अॅमेझॉनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाल्याने यावर सवलतीच्या दरात घरपोच अंक मिळविण्याची सुवर्णसंधी वाचकांसाठी आहे.

सकाळचे दिवाळी अंक आता अमेझॉनवर ! वाचकांसाठी विशेष सोय.. आता आपला दिवाळी अंक घरपोच मिळवा. 

शब्ददीप: https://goo.gl/XwXccB
सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w
अॅग्रोवन: https://goo.gl/Jn7VTF
साप्ताहिक सकाळ: https://goo.gl/66fLKh
तनिष्का: https://goo.gl/793JRP
प्रिमीयर: https://goo.gl/wA31Nx

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

SCROLL FOR NEXT