बातम्या

‘ट्रिगर फिश’मुळे मच्छीमारांवर आली संक्रात आली..

सकाळ न्यूज नेटवर्क

रत्नागिरी - माणसांना आवडणाऱ्या सुरमई, बांगडा माशावर झुंडीने ॲटॅक करून तो फस्त करणाऱ्या ‘ट्रिगर फिश’मुळे (काळा मासा) मच्छीमारांवर संक्रात आली आहे. समुद्रातील बदलल्या प्रवाहामुळे (करंट वेव) खोल समुद्रातील हे मासे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला आहे. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे गायब होतात. त्यामुळे ३५ टक्‍क्‍यांनी मत्स्य उत्पादन घटल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाने दिली. 

कोकणासह मुंबईतील मच्छीमारांनी केंद्रीय समुद्री मत्स्यिकी संशोधन संस्थेकडे (सीएमएफआरआय) याबाबतची तक्रार केल्याचे समजते. त्यानुसार संशोधकांकडून अभ्यास सुरू आहे. समुद्रातील बदलत्या प्रवाहामुळे हे मासे राज्याच्या किनारी भागात आल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. पिराणा माशाची अशी धास्ती असते. 

मांसाहारी असून ते कोणावरही हल्ला करून फस्त करतात. त्याच जातीतील हे ट्रिगर फिश आहेत. त्यांचे दात तीक्ष्ण आणि ते मांसाहारी (हायली कार्निओस) आहेत. दुसऱ्या प्रदेशात शिरून माणसांना आवडणाऱ्या माशांवर ते हल्ला करून फस्त करतात. हा मांसाहारी काळा मासा कोकणातील सागरी हद्दीतील सुरमई, बांगडा आदी चविष्ट माशांचा कर्दनकाळ ठरला आहे. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे गायब होऊ लागल्याने मत्स्य दुष्काळाचे सावट आहे. आक्रमक काळ्या माशांना हे चविष्ट मासे आवडत असल्याने त्यांच्यावर संक्रात आली आहे.

जिल्ह्याच्या किनारी भागत मच्छीमारांना गेली चार ते पाच महिन्यांपासून बंपर काळे मासे सापडत आहेत. 

ट्रिगर फिश हा मांसाहारी आणि धोकादायक मासा आहे. सुरमई, बांगडा या माशांवर झुंडीने हल्ला करून फस्त करतात. चाहूल लागली तरी अन्य मासे गायब होतात. त्यामुळे ३५ टक्के मत्स्य उत्पादन घटले आहे. 
- आनंद पालव, 
सहायक मत्स्य आयुक्त, रत्नागिरी

विशाखापट्टणम, तमिळनाडू या भागात ‘ट्रिगर फिश’ सापडतो. समुद्री प्रवाह बदलल्यामुळे ट्रिगर फिश राज्याच्या किनारी भागात आला आहे. मच्छीमार या माशांच्या अतिक्रमणामुळे अडचणीत आला आहे.
-पुष्कर भुते, 
स्थानिक मच्छीमार

Web Title: Fever of Trigger Fisher occurred on fishermen

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT