बातम्या

loksabha 2019 : पुण्यातील चौकीदारांना सोशल मीडियावरून पक्षाचा प्रचार करण्याचे प्रशिक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेले नसले, तरी सोशल मीडियावरून पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपने पुण्यातील चौकीदारांना प्रशिक्षण देऊन त्यांना सज्ज केले आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करा, विरोधकांच्या टीकेला उत्तर द्या, अशी भाजपची रणनीती ठरली आहे. 

‘नरेंद्र मोदी पुन्हा’ ही सोशल मीडिया कार्यशाळा पार पडली. भाजपचे केंद्रीय सचिव सुनील देवधर, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सोशल मीडिया सेलचे राज्याचे प्रमुख आशिष मेरखेड आदी या वेळी उपस्थित होते. 

मुद्रा बॅंक, जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, आयुषमान भारत, स्वच्छ भारत योजना, स्टर्टअप यांसह अनेक योजनांची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करा. जास्तीत जास्त पोस्ट शेअर करून सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला, टीकेला उत्तर द्या, असे देवधर यांनी सांगितले.

Web Title: Training by the BJP on Social Media

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : धक्कादायक! आईच्या मित्राची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर; घरी कोणी नसताना केलं संतापजनक कृत्य

Hindu Rituals: शास्त्रानुसार प्रसाद उजव्या हातात का घेतात?

Today's Marathi News Live : ठरलं! भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

Team India Sqaud: BCCI कडून मोठी चूक? टीम इंडियात निवड झालेल्या हे 2 खेळाडू IPL 2024 स्पर्धेत सुपरफ्लॉप

Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT