बातम्या

कोकणात आज मॉन्सूनचं आगमन होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सून पुण्यासह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता. २१) लांबण्याची यापूर्वीच वर्तविली होती. मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली असून, बुधवारीदेखील (ता. १९) प्रगतीची सीमा कायम होती. रविवारी (ता. १६) पूर्व भारतात पोचलेल्या मॉन्सूनने प्रगती केलेली नाही. आता मॉन्सूनच्या आगमनास बळकटी मिळाली आहे. 

बुधवारी (ता. १९) उत्तर मध्य प्रदेश आणि दक्षिण उत्तर प्रदेश परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. तर शनिवारपर्यंत (ता. २२) बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

वाढलेले वाऱ्याचे प्रवाह, समुद्राला उधाण येऊ लागले आहे. यातच किनारपट्टी भागात ढगांची दाटी झाली असून, कोकणात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे लवकरच मॉन्सूनचे आगमनाची वर्दी मिळणार असून, कोकणात उद्यापासून पाऊस जोर धरणार आहे. तर रविवारपासून (ता. २३) मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.


Web Title: Monsoon in Konkan rain

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT