बातम्या

पुण्यात चितळेंचं दूध वितरण पूर्णपणे ठप्प; पुणेकरांची दूधकोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क

दूध दरवाढीच्या आंदोलनाचे पडसाद चौथ्या दिवशी उमटायला सुरवात झालीये. राज्यभर दूधकोंडी सुरू असल्याने विविध डेअरी, दूध संघाकडून होणारे दूध संकलन गेल्या दोन दिवसात घटल्याने पुणे शहराला होणारं  दूध वितरणही पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुण्यात सर्वाधिक दूध वितरित होणाऱ्या चितळे डेअरीकडून आज, दूध विक्री होणार नसल्याचं वितरकांनी स्पष्ट केले आहे.

चितळे डेअरीकडून दररोज पुण्याला तब्बल साडे चार लाख लिटर दूधाचा पुरवठा होतो. मात्र चितळेंचं दूध वितरण पूर्णपणे ठप्प झाल्याने, पुणेकरांना आज कोराच चहा प्यावा लागणार आहे.

कात्रज डेअरीनेही नेहमीपेक्षा 25 हजार लिटर कमी दूध पुरवठा झाल्याने, पुणेकरांची दूधकोंडी होतेय. 

अमूल दूधाविरुद्ध मनसे रिंगणात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेचाही पाठिंबा दिलाय. गुजरातवरुन आणल्या जाणाऱ्या दुधाला मनसेनं विरोध दर्शनवालय. गुजरातच्या अमूल दूधाविरुद्ध मनसे रिंगणात उतरली असून या पार्श्वभूमीवर चांदीवलीत मनसेने आंदोलन केलं.

WebTitle : marathi news pune milk agitation effct chitale milk 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT