बातम्या

BIG BREAKING | कांदा कडाडला

साम टीव्ही न्यूज

 बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल १७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. बाजार समिती स्थापनेपासून इतिहासात पहिल्यांदाच कांद्याला उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती सभापती शंकर खेमनर यांनी दिली.

यावर्षी सेंद्री लाल कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील. म्हणून तालुक्यासह पठार भागावरील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्री कांदा केला होता. सुरुवातीला कांद्याचे पीक चांगले उतरूनही आले होते, पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार कांद्याची पेरणी करण्याची वेळ आली होती.

कांदा सडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली होती, पण आता थोड्याफार प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने सध्या सेंद्री लाल कांद्यासह गावठी कांद्याला सोन्याचे भाव आले आहे. असे असले तरी ज्या ठिकाणी पन्नास गोण्या कांदा निघत होता. आज त्या ठिकाणी पाच ते दहा गोण्या कांदा निघत आहे.

त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. जर परतीचा पाऊस झाला नसता, तर आज सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मालामाल झाला असता. . 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Lok Sabha: बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का; महाविकास आघाडीची ताकद वाढली!

Shirur Loksabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती 'तुतारी'; अमोल कोल्हेंची वाढणार चिंता?

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Today's Marathi News Live : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

Kenya Dam Burst : केनियामध्ये मोठी दुर्घटना; धरण फुटल्याने ३५ जणांचा मृत्यू, रात्री गाढ झोपेतच नागरिक वाहून गेले

SCROLL FOR NEXT