बातम्या

पुनर्विवाहानंतरही आता विधवांना मिळणार निवृत्तिवेतनाचा लाभ

सकाळ न्यूज नेटवर्क

नागपूर - शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर दिवंगत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला शासनाकडून निवृत्ती भत्ता दिला जातो. अर्धे वेतन दरमहा अदा केले जाते. मात्र, कर्मचाऱ्याच्या पत्नीने नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केल्यास तिला मिळणारा लाभ काढून घेण्यात येत होता. मात्र, शासनाने या निर्णयात सुधारणा करीत कर्मचाऱ्याच्या विधवेने पुनर्विवाह केल्यानंतरही आता निवृत्तिवेतनाचा लाभ मिळत राहील. 

नुकतेच राज्य शासनाच्या अर्थ विभागाने ७ फेब्रुवारी २०१९ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ११ जून २०१५ पूर्वी पुनर्विवाह केला असेल, तर त्यांनाही या अद्यादेशानुसार लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम ११६ (५) (एक) मध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर शासनाने नवा अध्यादेश जारी केला आहे. 

ज्या विधवांना कुटुंबनिवृत्ती वेतन २०१५ ला बंद झाले असेल, त्यांना पुढील काळातील थकबाकीचा लाभ वगळता पुढे विधवा पत्नी जीवित असेपर्यंत लाभ मिळेल. असे अध्यादेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या विधवांना न्याय देणारा हा निर्णय असून यामुळे विधवांच्या आयुष्यातील संकट दूर होतील. यासंदर्भात अटी व शर्तीसह संबंधित कार्यालयांकडे रितसर अर्ज करण्यात यावा, असेही अध्यादेशात नमूद आहे.

WebTitle : marathi news now widows will get pension even after second marriage  


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

Hair Care Tips: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

SCROLL FOR NEXT