बातम्या

श्रीलंकेत बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्यांनी काश्‍मीर, केरळ आणि बंगळूरला दिली होती भेट

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांपैकी काही जणांनी भारतातील काश्‍मीर, केरळ आणि बंगळूरला भेट दिली होती. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असावे, असा दावा श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी केला आहे. 

श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे दावे केले आहेत. श्रीलंकेत साखळी बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्यांपैकी काही दहशतवाद्यांनी भारताला भेट दिली होती. काश्‍मीर, बंगळूर आणि केरळमध्ये त्यांना प्रशिक्षण मिळाल्याची शक्‍यता आहे. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगणारे काही धागेदोरे आमच्या हाती लागले आहेत, असे सेनानायके म्हणाले. 

सेनानायके म्हणाले, की हल्लेखोरांनी भारताला दिलेल्या भेटीत नेमके काय केले, याबाबत ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, स्फोटांचे स्वरूप आणि ठिकाणे पाहता त्यामागे आंतरराष्ट्रीय गटांचा हात असावा, अशी शक्‍यता आहे. 

श्रीलंकेत अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, असा इशारा भारतीय गुप्तचर संस्थांनी श्रीलंकेला आधीच दिला होता. श्रीलंकेतील साखळी बॉंबस्फोटांमध्ये 253 जणांचा मृत्यू झाला होता, तर पाचशेहून अधिक जण जखमी झाले होते. हे बॉंबस्फोट नऊ जणांनी केले होते. त्यात एका महिलेचाही समावेश होता. 

Web Title: Suicide bombers visited Kashmir Kerala Bengaluru says Sri Lankan Army chief

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT