बातम्या

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनी देशवासियांना लिहिले पत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : 'माझ्या मित्रांनो, तुमची काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या धाडसाने बोलत आहे ते पाहा....एक खरा जवान.... आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे, असे भावूक पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहिले आहे.

भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई दलाने पळवून लावले. यादरम्यान भारताचे मिग 21 विमान पाकिस्तानमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले व विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हाती लागले. अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजल्यानंतर संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी उभा राहिला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी या विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी देशवासियांना उद्देशून भावनिक पत्र लिहिले आहे व वैमानिकाबद्दल दाखवलेल्या काळजीसाठी, केलेल्या प्रार्थनांसाठी देशवासियांचे आभार मानले आहेत. अभिनंदन यांचे वडील भारतीय हवाई दलातील निवृत्त एअर मार्शल आहेत.

पत्रात ते लिहितात की, 'माझ्या मित्रांनो, तुमची काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या धाडसाने बोलत आहे ते पाहा....एक खरा जवान.... आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे. तुमच्या आशीर्वादाचे हात त्याच्या डोक्यावर आहेत, त्याच्या सुखरुप सुटकेसाठीच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत, याची मला खात्री आहे. त्याचा छळ होऊ नये तसंच शरीर आणि मनाने सुखरुप मायदेशी परतेल यासाठी मी प्रार्थना करतो. अशा नाजूक क्षणी तुम्ही आमच्यासोबत आहात, यासाठी मी आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि ऊर्जेमुळे आम्हाला बळ मिळाले आहे.'

दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदनला लष्कराच्या नियमानुसार वागवले जात असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटीजने #BringBackAbhinandan तसेच #GivebackAbhinandhan हे हॅशटॅग वापरून अभिनंदला सुखरुप परत भारतात आणण्याची विनंती दोन्ही देशाच्या राज्यकर्त्यांकडे केली आहे.

Web Title:Indian Air Strike: Wing Commander Abhinandan Varthaman father issues statement my son safe and return from Pakistan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पीएम मोदींची पुण्यात सभा, चारही उमेदवार राहणार उपस्थित

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

Sahil Khan arrests in Mahadev betting app case | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

SCROLL FOR NEXT