Smart Phone, Smart Phone 2020
Smart Phone, Smart Phone 2020 
बातम्या

नव्या वर्षात येणार नवे SmartPhones; पाहा कोणते आहेत नवे खास मोबाईल

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याच्या जीवनात मोबाईल फोन ही एक सुविधा राहिली नसून गरज बनली आहे. लहाणापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला फोन हा हवाच असतो. अनेकांची तर संपूर्ण कामेच फोनवर अवलंबून आहेत. त्यात आजकाल फोन हा केवळ कॅालिंग किंवा मेसेज पाठविण्याचे काम करत नसून एका कॅाम्प्युटर इतके काम करू लागला आहे. दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानायुक्त फोन बाजारात येत असून येत्या वर्षांतही एकापेक्षा एक कमाल फोन बाजारात दाखल होणार आहेत. 

2020 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना यंदा बाजारात विविध मोबाईल कंपन्यान बाजारात आपले नवीन फोन दाखल करणार आहेत. यात सँमसंग, वनप्लस, गुगल पिक्सलसह अॅपल देखील आपले नवीन फोन लॅान्च करणार आहे. चला तर जाणून घेऊ काही नवीन येणाऱ्या फोन्सबद्दल

1. सँमसंग गॅलॅक्सी एस 11 

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी सँमसंग लवकरच नवीन मॅाडेल सँमसंग गॅलॅक्सी एस 11 भारतीय बाजारात दाखल करणार असून मिळालेल्या माहितीनुसार 6.4 इंच इतकी मोठी डिस्प्ले स्क्रिन देण्यात येणार आहे. तसेच कॅमेऱ्यांची संख्यादेखील आधीच्या मॅाडेलपेक्षा अधिक असणार असल्याचे सांगितले जात आहे.

2.वनप्लस 8 लाईट

काही वर्षांतच भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली वन प्लस कंपनी देखील आपले नवीन मॅाडेल वनप्लस 8 लाईट बाजारात दाखल करणार आहे. हा फोन जलद गतीने वापरता यावा यासाठी स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट बसविण्यात आला आहे. याची डिस्पे स्क्रिन देखील वनप्लस 7 च्या तुलनेत मोठी असणार असल्याचे सांगितले जात आहे.

3. मायक्रोसॉफ्ट सरफेस फोन

मायक्रोसॉफ्ट कंपनीने कॅाम्प्युटर क्षेत्रासह मोबाईल क्षेत्रात ही मागील काही वर्षात पदार्पण केले असून लवकरच ही कंपनी सरफेस फोन हे मॅाडेल भारतीय बाजारात दाखल करणार आहे. याआधी अॅाक्टोबरमध्ये कंपनीने या फोनची जागतिक बाजारात घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार एका पुस्तकाप्रमाणे हा फोन उघडणार असून त्याचप्रकारे त्याचा वापर केला जाणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये क्वाड एचडी स्क्रीन देण्यात येणार असून तिचे रेसिल्यूशन 2560 x 1440 पिक्सल पर्यंत असणार आहे. तसेच फोनचा मागील कॅमरा 21 मेगापिक्सल असणार आहे व पुढील कॅमेरा 16 मेगापिक्सल असेल.

4.आयफोन 12

जगातील आघाडीची कंपनी अॅपलने सप्टेंबरमध्येच आयफोन 11 बाजारात दाखल केला. त्यामुळे आयफोन 12 ची सर्वांनाच उत्सुकता लागली असून 2020 मध्ये हा फोन दाखल होणार आहे. यात चौकोनी आकाराच 4 कॅमेरे देण्यात येणार असून  5जी कनेक्टिविटी व ओएलईडी डिस्प्ले देण्यात येणार आहे.

5.गुगल पिक्सल 5

नुकताच अॅाक्टोबरमध्ये गुगलने पिक्सल सिरीज 4 चे फोन बाजारात दाखल केले असून पुढच्याच वर्षी कंपनी पिक्सल 5 ही बाजारात आणणार आहे. या फोनबद्दल कोणतीही माहिती अद्याप बाजारात उपलब्ध नसून हा फोन 2020 मध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

web title : upcoming phones 2020 india

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT