बातम्या

बिग बॉस मराठी सिझन 2 चा पडदा 26 मे ला उघडणार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हिजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिऍलिटी शो 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनचा पडदा 26 मे ला उघडणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील 15 लोकप्रिय व्यक्तिमत्त्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉसचे घर जे तब्बल 14,000 चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. या घराला आलिशान अस्सल मराठमोळ्या वाड्याचे स्वरुप देण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. या वेळी कोण कोण बिग बॉसच्या घरात जाणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

महेश मांजरेकर याबाबत बोलताना म्हणाले, "बिग बॉस मराठी हा मराठी टेलिव्हीजनवरील सगळ्यात महत्त्वाचा शो आहे असं मला वाटतं, कारण या कार्यक्रमामुळे आपल्याला माणसं खऱ्या आयुष्यात कशी आहेत ते बघायला मिळतं. घरामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे चेहऱ्यावर असलेले मुखवटे काही क्षणातच पूर्णपणे उतरून जातात. आणि यामुळेच हा शो प्रेक्षकांना खरा वाटतो. माझ्या चाहत्यांना कार्यक्रमाबद्दल खूपच उत्सुकता आहे, मला खात्री आहे पहिल्या सिझनप्रमाणे हा सिझनदेखील त्यांच्या पसंतीस उतरेल.

Web Title: Bigg Boss Marathi season 2 starts from 26 May

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

SCROLL FOR NEXT