बातम्या

पेटीएम बँक खात्याला जोडणार असल्याची बतावणी करून तरूणाच्या खात्यातून ५५ हजार रूपये लंपास

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : पेटीएम बँक खात्याला जोडणार असल्याची बतावणी करून एका तरूणाच्या खात्यातून तब्बल ५५ हजार रूपये लंपास केले आहेत. दादरमध्ये घडलेल्या या प्रकाराने अनेकांनी धसका घेतलाय. दादरमधील जीस्बन लोबो या तरूणाचं प्रभादेवीच्या युनिअन बँकेतील शाखेत अकाऊंट आहे.

ऑनलाईन व्यवहारासाठी त्याने वर्षभरापूर्वी पेटीएमवर खातं उघडलं, त्यानुसार त्याला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची होती. त्याने केवायसी सेंटरला फोन केला तेव्हा मोबाईल नंबर बंद होता, थोड्यावेळाने त्याच नंबरवरून त्याला कॉल आला आणि जीस्बनने आपली आधारकार्ड आणि बँक खात्याची माहिती समोरच्या व्यक्तीला दिली. मात्र त्यानंतर केवायसी अपडेट करत असल्याचं कारण सांगत ओटीपी क्रमांक घेऊन समोरच्या व्यक्तीने ५५ हजार रूपये लंपास केले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करता आहेत.

Webtitle : 55 thousand rupees from the account of youth has lost 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT