बातम्या

VIDEO | गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत प्रकाश शेंडगेंचा खळबळजनक खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्यावर भाष्य करत महाराष्ट्रात खळबळ उडवून देण्याचे काम भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.

दरम्यान, सत्ता गेल्यानंतर भाजप पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे. 

भाजप फक्त ओबीसी नेत्यांना पक्षासाठी, निवडणुकीसाठी वापरून नंतर त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला आहे. भाजपने बहुजन समाजाच्या नेत्यांना खुप त्रास दिला आहे. त्यामुळेच सध्या पंकजा मुंडे यांना भाजप जाणीवपुर्वक त्रास देत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनादेखील पक्षातून काढण्याचा ठराव भाजपने मंजूर केला होता परंतू, आम्ही सर्वांनी विरोध करत हा ठराव फेटाऴून लावला होता.

पहिल्यापासून भाजप ओबीसी नेत्यांना डावलत आली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव बैठकीत ठेवण्यात आला होता. आम्ही त्या बैठकीत गोपीनाथ मुंडे हे भाजपचा आत्मा आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला तळागाळापर्यंत पोहचवले. त्यांना पक्षातून काढू नये असे मत, मांडून त्या ठरावास कडाडून विरोध केला होता. यावेळी त्या बैठकीला पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या असेही आमदार शेंडगे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ''भाजप फक्त बहुजन नेत्यांचा फायदा घेेते, आणि नंतर त्यांना डावलते. याच बाबतीत उदाहरण द्यायचे झाले तर अण्णा डांगे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे तसेच माझेही देता येईल. बहूजन समाजातील नेत्यांना वापरून नंतर खड्यासारखे दूर करायचे हे भाजपचे पहिल्यापासून धोरण राहिले आहे. मी पंकजा यांना पक्ष सोड असे म्हणणार नाही, कारण त्या त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत.'' 

Web Title: Ex MLA Prakash Shedge reveals that BJp was trying to rule out Gopinath Munde from party

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT