बातम्या

मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानी यांनी प्रसिद्ध केला व्हिडिओ

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी देवरा यांना पाठिंबा दर्शविला आहे.

मुकेश अंबानी यांच्यासह कोटक महिंद्रा ग्रुपचे मालक उदय कोटक यांनीही आपला पाठिंबा देवरा यांना दर्शविला आहे. अंबानी आणि कोटक यांच्यासह इतर काही दुकानदार आणि छोट्या व्यापाऱ्यांनीही आपले समर्थन दिले आहे. याबाबतचा व्हिडिओ देवरा यांनी ट्विट केला असून, यामध्ये सांगितले, की ''दक्षिण मुंबईचा अर्थ म्हणजे उद्योग. यासोबतच जेव्हा मी विजयी होईन तेव्हा मी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेन. तरुणांना रोजगार देणं ही माझी प्राथमिकता आहे''

तसेच मुकेश अंबानी यांनी ट्विटमध्ये सांगितले, की ''मिलिंद इज द मॅन फॉर साऊथ मुंबई (दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा योग्य उमेदवार) आहेत. मिलिंद यांना विविध मुद्यांवर विशेष माहिती आहे. ते तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देतील, असा मला विश्वास आहे.

Web Title: Marathi News Mukesh Ambani Supporting to Congress Candidate Milind Deora

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आणि धनुष्यबाण सोडवण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT