बातम्या

भाजपच्या सध्याच्या राजकारणावर डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल 

सकाळ न्यूज नेटवर्क

परभणी : भाजप सरकारला राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास नसल्याने सत्तेचा गैरवापर करीत इकडून-तिकडून माणसे जमवली जात आहेत. वरच्या दोन-तीन विटा पडल्या म्हणून सारी भिंत खचत किंवा कोसळत नसते. त्याचप्रमाणे तळातला कार्यकर्ता मजबूत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही मजबूत आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपच्या सध्याच्या राजकारणावर हल्लाबोल केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची "शिवस्वराज्य यात्रा' गुरुवारी (ता. 22) परभणीत दाखल झाली. त्या वेळी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर डॉ. कोल्हे यांनी युवक-युवतींशी संवाद साधला. ते म्हणाले, "विद्यमान सरकारकडून युवकांच्या भावनांचा खेळ मांडला जात आहे. युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा झाला असून, "मेगा भरती'च्या नावाचे गाजर दाखविणाऱ्या सरकारला युवाशक्तीने धडा शिकवला पाहिजे. व्यवस्था बदलायची असेल, तर आधी सरकार बदलायला हवे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास सहा महिन्यांत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून मेगा नोकरभरती करू.'' 
आमदार रामराव वडकुते, माजी महापौर प्रताप देशमुख, संगीता वडकर आदी उपस्थित होते. 

पूरस्थितीचे गांभीर्य नाही 
सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता, असे सूत्र अवलंबत विद्यमान सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत आहे, असा आरोप करून डॉ. कोल्हे म्हणाले, "आलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले असते, तर एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली नसती. दोन्ही राज्यांत भाजप सरकार असतानाही पुराचे गांभार्य ओळखले नाही, याचे आश्‍चर्य वाटते.'' 

Web Title: MP Amol Kolhe speaks at Parbhani about NCP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

SCROLL FOR NEXT