बातम्या

बोर्डाच्या परीक्षेत दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिला आक्षेपार्ह मजकूर

सकाळ न्यूज नेटवर्क

औरंगाबाद - बोर्डाच्या परीक्षा म्हटले, की विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप धास्ती असते. विद्यार्थी खूप अभ्यास करून पेपर लिहितात; मात्र यावर्षी झालेल्या बारावीच्या पेपरमध्ये औरंगाबाद विभागातील दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहून बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केले. यात काहींनी उत्तराऐवजी चक्क प्रेमपत्र लिहिले, तर काहींनी उत्तीर्ण करा; अन्यथा घरून पळून जाईल, अशी धमकी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली. यामध्ये दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये उत्तरे लिहिण्याऐवजी आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे.

काही विद्यार्थ्यांनी चक्क मराठी, हिंदी चित्रपटांतील गाणी लिहिली; तर काहींनी परिस्थिती नाजूक असल्याने मला पास करावे, अशी विनंती केली. काही विद्यार्थ्यांनी प्रेमपत्र; तर काहींनी मला पास करावे. नाही तर मी घरातून पळून जाईल, अशा धमकीचा मजकूर लिहिलेला आढळला. 

आक्षेपार्ह सर्व पेपरबाबत बोर्डाकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळांना माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कशी लिहावी, याबाबत शाळांनी मार्गदर्शन करावे, अशी सूचना करण्यात येणार आहे, असे बोर्डाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT