बातम्या

दादर परिसरात मनसेचं भगवं वादळ

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या भूमिकेत बदल करणार असल्याचे चिन्ह आहेत. राज ठाकरे भगवा झेंडा हाती घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. २३ जानेवारीला मनसेच पहिलंच अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी मनसेकडून दादर आणि शिवसेनाभवन परिसरात आज जोरदार पोस्टरबाजी  केलीये. 

शिवसेनाभवन परिसरात राज ठाकरेंचे भगव्या रंगात असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडी आणि शिवसेना यांना डिवचण्यासाठी ही पोस्टर बाजी केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

काय लिहिलय त्या पोस्टरवर

"सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट" अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आलाय. त्यामुळे सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेलेल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. विशेष म्हणजे हे संपूर्ण पोस्टर भगव्या रंगात आहे त्यामुळे मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार हे आता निश्चित आहे.

पोस्टरबाजीवर काय म्हणाले मनसेचे नेते संदीप देशपांडे

 "ज्या महाराष्ट्र धर्मासाठी मनसे सतत लढा देत आली आहे, त्या महाराष्ट्र धर्मावर जेव्हा संकट येतं तेंव्हा मनसे सतत लढा देत असते. जेव्हा वेळ येईल त्या प्रत्येक वेळी मनसे महाराष्ट्र धर्मासाठी लढा देईल" असं संदीप देशपांडे म्हणाले. मात्र याच वेळी भगव्या रंगाच्या पोस्टर बद्दल उत्तर देण्यास देशपांडेंनी टाळाटाळ केली.

सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मा साठी एकच सम्राट pic.twitter.com/nH28n0JBwA

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 17, 2020

भाजपसोबत जाण्याबाबत काय म्हणाले मनसेचे नेते

मनसे भाजपसोबत जाऊन भगवा हाती घेणार का? हा प्रश्न सतत मनसे नेत्यांना विचारला जातोय. मात्र, याबद्दलचा निर्णय राज ठाकरे घेतील. सध्यातरी अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, असं सतत मनसे नेत्यांकडून सांगण्यात येतय. मात्र दादरमध्ये होत असलेल्या या पोस्टरबाजीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Webtitle: MNS Raj Thakrey Saffron banners in Dadar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

SCROLL FOR NEXT