बातम्या

लवकरच जम्मू काश्मीरमध्ये मेगाभरती

सकाळ न्यूज नेटवर्क

'येत्या सहा महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून, त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,' असे मलिक म्हणाले. येत्या दोन ते तीन महिन्यांत सर्व सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार असून काश्मिरी जनतेने सरकारी सेवेत दाखल व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

'जम्मू-काश्मीरमध्ये विविध सरकारी खात्यांतील ५० हजार जागा रिक्त असून, या जागा लवकरच भरण्यात येतील,' अशी घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे. मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील कलम ३७० नुकतेच हटविण्यात आले आहे.
'काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानी फोन आणि इंटरनेटचा वापर करत होते. इंटरनेटद्वारे काश्मिरी जनतेच्या भावना भडकावण्याचे काम केले जात होते. भारताविरोधात हे हत्यार वापरण्यात येत होते. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली,' असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले. राज्यातील इंटरनेट सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे आश्वासनही राज्यपालांनी दिले. कुपवाडा आणि हंडवाडामध्ये मोबाइल सेवा सुरू करण्यात आली आहे, इतर जिल्ह्यांतही लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

काश्मीरबाबत अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी आंदोलने झाली; पण त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. आमच्यासाठी प्रत्येक काश्मिरींचा प्राण महत्त्वाचा आहे. हिंसाचार करणारे काही लोक कमरेखाली मार लागल्याने जखमी झाले आहेत,' असे मलिक म्हणाले.

Web Title megabari in jammu and kashmir

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT