बातम्या

शेतकऱ्यांना उन्हाच्या चटक्याबरोबर महावितरणचा झटका

सकाळ न्यूज नेटवर्क

वालचंदनगर (पुणे) : विद्युत पंपाची बिले थकविणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडीत करुन  महावितरणाने झटका देण्यास सुरवात केली आहे.

राज्यामध्ये महावितरणीची ३९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणाने वीजपुरवठा खंडीत मोहिमेस सुरवात केली आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली अाहे. विहिरींची पाण्याची पातळी घटली असून शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असताना महावितरणने विद्युत पंपाची बिले थकलेल्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच संपूर्ण विद्युत रोहित्रावरील थकबाकीचे प्रमाण जास्त असल्यास विद्युत रोहित्राचा पुरवठा खंडीत करण्याची मोहिम सोमवार (ता. १९) पासुन सुरवात केली आहे.

महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये सापडला असून विहिरीमध्ये पाणी असतानाही थकबाकीमुळे शेतकऱ्यांची पीके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब पिकांचा बहार धरला अाहे. डाळिंबाच्या झाडांना कळ्या आल्या आहेत. पाण्याची कमतरता झाल्यास कळी गळण्यास सुरवात होणा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासंदर्भात वालचंदनगर परीमंडळाचे महावितरणचे अभियंता मोहन सुळ यांच्याशी संपर्क साधला असताना शेतकऱ्यांनी वीजबिले भरुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

SCROLL FOR NEXT