बातम्या

राज्यात जानेवारीपासून चारा छावण्या

सकाळ न्यूज नेटवर्क

सोलापूर : दुष्काळामुळे चाऱ्याअभावी संकटात सापडलेल्या पशुधनाला वाचविण्यासाठी जानेवारीपासून गरजेच्या ठिकाणी 203 चारा छावण्या सुरु करण्याचे ठोस नियोजन मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह अन्य विभागातील नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाला सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

सद्यस्थितीत चारा लागवडीसाठी बियाणे-खते मोफत दिली जात असून वन, आदिवासी विकास महामंडळ, शेती महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र यासह अन्य शासकीय विभागांना त्यांच्या अतिरिक्‍त जमिनीवर चारा लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उपलब्ध गवताचे लिलाव महसूल विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय करु नयेत, अशाही सूचना दिल्या आहेत. तत्पूर्वी दुष्काळी तालुक्‍यांमधील जनावरांच्या चाऱ्याची स्थिती, पाण्याची टंचाई यासह अन्य बाबींचा विचार करुन चारा छावण्या सुरु करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीदिली.

WebTitle : marathi news maharashtra government to star fodder cams from january 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT