राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले असतानाच भाजप नेते एकनाथ खडसेंच्या समर्थकांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र दोनच दिवसांपुर्वी गिरीश महाजनांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने खडसेंच्या मंत्रिमंडळातल्या प्रवेशाला विलंब लागण्याचे संकेत मिळत आहेत.
पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी आरोप झाल्याने खडसेंना जून 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची किंमत खडसेंना द्यावी लागल्याची त्यावेळी उघड चर्चा होती. विशेष म्हणजे वर्षभरापुर्वी एसीबीने खडसेंना भोसरी जमीन विक्री प्रकरणी क्लीन चीट दिल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळ पुनर्प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र अद्यापही पक्ष नेतृत्वाने खडसेंना झूलवतच ठेवले आहे.
पक्षनेतृत्वाच्या या दुर्लक्षामुळे नाराज खडसेंनी मध्यंतरी मंत्रीमंडळात परण्यास आपण अजिबत इच्छुक नसल्याचे वक्तव्य जळगावातील एका मेळाव्यात बोलताना केलं होतं. पक्षात एकाकी पडलेल्या खडसेंना थेट मंत्रीपद न देता, प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लावली जाईल अशी चर्चा आहे. तसं झाल्यास आगामी काळात खडसेंचा विजनवास संपण्याचे ते संकेत असतील.
WebTitle : marathi news maharashtra cabinet expansion bjp eknath khadse politics
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.