बातम्या

लोकसभा उपाध्यक्षपद सेनेला नाहीच ? दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेला डावललं जातंय ?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला डावलेले जात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच लोकसभेचे उपाध्यक्षपदही शिवसेनेला मिळणार नसल्याची शक्‍यता निर्माण झाल्याने शिवसेना नेते हवालदिल झाले आहेत. 

या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह योग्य निर्णय घेतील, असे शिवसेनेचे नेते खासगीत बोलताना सांगत आहेत. 

दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेला डावलेले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजपचे नवे मित्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. मोदी सरकारने याबाबत जगनमोहन रेड्डी यांना ऑफर दिली असल्याच्या बातम्या येत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरुपती दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी रेड्डी यांना लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आग्रही आहे. 

गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना उद्धव यांनी उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याची मागणी केली होती. मात्र, दिल्लीतील घडामोडी लक्षात घेता आता शिवसेनेला उपाध्यक्षपदापासूनही दूर राहावे लागण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात शिवसेनेत घालमेल सुरू झाली असली तरी शिवसेनेचे नेते उघडपणे प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत. 

WebTitle : marathi news loksabha deputy chairman shivsena bjp delhi politics 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT