बातम्या

"लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या धुमाकूळ घालत असलेले "लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला मिळणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे गाजलेले व्हिडीओ डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून गल्लीबोळात पोहोचवणार आहेत. या मोहिमेची सुरुवात माहीम कोळीवाड्यापासून होईल. 

मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफा डागल्या आहेत. या जाहीर सभांमध्ये ते केवळ आरोप न करता भाजपने केलेल्या जाहिराती आणि वस्तुस्थिती असे व्हिडीओ दाखवत आहेत. या चित्रफिती दाखवण्यापूर्वी त्यांचे "लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य राज्याच्या राजकारणात गाजत आहे. 

राज ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवरही "हिट' झाले आहेत. "लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्‍य अनेकांच्या मुखात जाऊन बसले आहे. हे व्हिडीओ आता मुंबईतील नाक्‍यानाक्‍यावर दाखवले जाणार आहेत. त्यासाठी मनसेच्या डिजिटल व्हॅन माहीम कोळीवाड्यापासून अनेक ठिकाणी उभ्या केल्या जात आहेत. माहीम, दादर परिसरात तीन डिजिटल व्हॅन आहेत. मोदीमुक्त देशासाठी इतर भागांतही याच पद्धतीने प्रचार करण्यात येईल, असे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. 

घराघरात प्रचार 
मनसे रस्त्यांवर डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून भाजपविरोधात प्रचार करणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्ते घराघरात जाऊन राज ठाकरे यांचे विचारही मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. संपूर्ण शहरात या पद्धतीने धडाका लावला जाईल, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.

Web Title: MNS Digital van

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

Summer Kitchen Hacks : उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

Today's Marathi News Live: इंडिया आघाडीत डब्बे नाही, प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे; देवेंद्र फडणवीस

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

Viral Video: अरेरे! 'नवी कोरी' कार घेतली; पठ्ठ्याने दारात आणण्याआधीच वाट लावली.. थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT