बातम्या

इसिसचे दोन संशयित हैदराबादमधून अटकेत 

सकाळ न्यूज नेटवर्क

हैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले. अब्दुल्ला बासिथ (वय 24) आणि अब्दुल कादीर (वय 19) अशी या संशयितांची नावे असून राष्ट्रीय तपासयंत्रणेने यांच्यासह आठ जणांची चौकशी केली होती.

राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधील सात ठिकाणांवर छापा टाकला होते. यात इसिसशी संबंध असलेल्या आठ जणांची चौकशी करण्यात आली होती. तपासाअंती अब्दुल्ला बासिथ व अब्दुल कादीर यांचे इसिसशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. इसिस संघटनेसाठी नवीन तरूणांची भरती व भारतात दहशतवादी कारवायांचा कट केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपासयंत्रणेचे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी दिली.

अब्दुल्ला बासिथ याला यापूर्वी 2014 व 2015 मध्येही अटक झाली होती. यापूर्वी त्याने सिरीयाला जायच्या प्रयत्नात असताना अटक केली होती. बासिथसह चारजण सिरीयाला जायच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, पण त्यावेळी त्यांचे वय कमी असल्याने समुपदेशन करून सोडून देण्यात आले होते. 2015 मध्ये बासिथ पुन्हा भावासोबत सिरीयाला जायच्या प्रयत्नात असताना विमानतळावर पकडला गेला होता. त्यानंतर तो सोशल मीडियाद्वारे इसिसच्या संपर्कात होता, हे समोर आले. त्यामुळे त्याला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली.

बासिथ, कादीरसह चौकशी केलेल्या पाचही तरुणांचे मोबाईल, लॅपटॉप व इतर सामान तपासयंत्रणेने जप्त केले आहे.

WebTitle : marathi news isis suspect arrested from Hyderabad 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT