बातम्या

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याचा अहवाल भारताने फेटाळला

सकाळ न्यूज नेटवर्क

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याचा अहवाल भारताने फेटाळला आहे. देशातील नागरिकांना संविधानाद्वारे देण्यात आलेल्या संरक्षित अधिकारावर अमेरिकेने वक्तव्य करण्यात कोणतेच औचित्य नसल्याचे भारताने म्हटले आहे. वर्ष २०१८ मध्ये हिंदू कट्टरपंथीय समूहाकडून अल्पसंख्यांकांवर हल्ले झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. याचे उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, भारताला धर्म निरपेक्षतेची विश्वसनीयता, सर्वांत मोठी लोकशाही तसेच सहिष्णुता आणि सर्वसमावेशक समाजावर अभिमान आहे.

दरम्यान, यापूर्वी भाजपने अमेरिकेच्या विदेश विभागाने जारी केलेला आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्रता अहवाल हा नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपप्रती पूर्वग्रहाने प्रेरित आणि खोटा असल्याचा आरोप केला. भारताची लोकशाहीची मुळे अत्यंत खोलवर रुजली असल्याचे त्यांनी म्हटले. हे मोठे षडयंत्र असून पूर्णपणे असत्य असल्याचे भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बलूनी यांनी म्हटले.

Web Title: India rejects international religious freedom report of US Department of State

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण उपाय ठरेल एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची पाणी क्षमता वाढली

Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

Indi News: मोठी दुर्घटना! यात्रेत रथ अंगावरुन गेल्याने तिघांचा मृत्यू; कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT