बातम्या

खूशखबर! आता घरं स्वस्त होणार!

साम टीव्ही न्यूज

मुंबईच्या महागड्या भागातील घरांचे दर 2020 मध्ये कमी होण्याची शक्यता आहे. किमान 1 टक्क्यांनी घरांचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे 2019मध्ये स्थिर राहिलेल्या बांधकाम क्षेत्राला पुढच्या वर्षी तेजी येण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या 2 लाख 21 हजार घरं विक्रीविना पडून आहेत. तरीही त्यांचे दर कमी झालेले नाहीत. मात्र आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी 2020 हे वर्ष दिलासा देणारं ठरणारे. पुढील वर्षी घरांचे दर कमी होणार असले तरी मोक्याच्या ठिकाणची घरं सहजासहजी विकली जाणार नाहीत. तिथे मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाबतीत थोडी घसरण झालेली आढळेल..तसंच महागडी घरंही पडून राहतील असं एका सर्वेक्षणात समोर आलंय.

दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केलीय. त्यामुळे कर्जदारांना विशेषतः गृह आणि वाहन कर्जदारांना  दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेनं नुकतंच पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी 'एसबीआय' ही पहिली बँक ठरलीय. 

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

Web Title - 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT