बातम्या

सलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी महागला

सकाळ न्यूज नेटवर्क

सलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 17 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 83.40 रुपये तर डिझेलसाठी 76 रुपये 5 पैसे मोजावे लागत आहेत. 

गेल्या 24 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल साडे चार रुपयांनी कमी झालेत.  दसऱ्यापासून सुरु झालेले इंधनाच्या दरकपातीचं सत्र सुरुच आहे. मागील 24 दिवासांत पेट्रोल 4 रुपये 81 पैसे तर डिझेल 3 रुपये 21 पैशांनी स्वस्त झालंय. सलग उतरणाऱ्या दरांमुळे राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी पेट्रोलचे दर 85 रुपये प्रति लीटरच्या खाली आलेत. 

अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला
अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला आहे. केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी ही दरवाढ केल्याचं कळतंय. या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 505.05 रुपये झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unseasonal Rain | बीड- वर्ध्याला अवकाळीचा फटका, शेतीचं मोठं नुकसान Marathi News

Maharashtra Election: दिंडोरी लोकसभेत भाजपच्या माजी खासदाराची बंडखोरी; भारती पवारांची डोकेदुखी वाढणार

Today's Marathi News Live : महंत अनिकेत शास्त्री यांची नाशिकच्या निवडणुकीतून माघार

China News: चीनमध्ये मृत्यूचं तांडव! महामार्ग ५८ फूट खचून १९ मृत्यू; २० वाहनं ढिगाऱ्याखाली, आकडा वाढण्याची भीती

Weight Loss: झटपट वजन घटवा; 'हे' व्यायाम करतील मदत

SCROLL FOR NEXT