China News
China Guangdong Highway CollapsesSaam Tv

China News: चीनमध्ये मृत्यूचं तांडव! महामार्ग ५८ फूट खचून १९ मृत्यू; २० वाहनं ढिगाऱ्याखाली, आकडा वाढण्याची भीती

China Guangdong Highway Collapses: चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा काही भाग खचला (highway collapses) असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमध्ये जवळपास २० वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.

चीनमध्ये भीषण अपघाताची (China Accident) घटना समोर आली आहे. चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतात महामार्ग खचून १९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा काही भाग खचला (highway collapses) असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमध्ये जवळपास २० वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावर मदतकार्य वेगाने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री २.१० वाजता ही घटना घडली. मेइलॉन्ग महामार्गाचा जवळपास १७.९ मीटरपर्यंत म्हणजेच ५८ फूटांचा भाग खचला. या घटनेमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितले नाही.

China News
Covishield Vaccine : घाबरू नका! Covishield घातक नाही; कोरोनाविषयी प्रत्येक अपडेट देणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ आला समोर

घटनास्थळावर ५०० पेक्षा अधिक जण मदतकार्य करत आहेत. १९ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर ३० जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Meizhou शहर आणि Dabu County दरम्यान S12 महामार्गाचा सुमारे ५८ मीटरचा भाग अचानक खचला.

China News
Rupali Ganguly Joins BJP: मोठी बातमी! 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, हाती घेतले कमळ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये दिसत आहे की ढिगाऱ्याखाली वाहनं दबलेली दिसत आहे. या वाहनांमधून धूर निघत असल्याचे दिसत आहे. हा महामार्ग नेमका का खचला यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, ग्वांगडोंग हा चीनची सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रांत आहे. मागच्या आठवड्यात अचानक आलेल्या पुरामुळे याठिकाणी चार लोकांचा मृत्यू झाला आणि १ लाख १० हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

China News
Gst Collection : लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतिहास रचला; पहिल्यांदा जीएसटी वसुली २ लाख कोटी पार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com