बातम्या

शिक्षणाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत STचा पास मोफत

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. 

आतापर्यंत ही सवलत दहावीपर्यंतच्या मुलींसाठी होती. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या वेळी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे दोन कोटी १८ लाख लाभार्थींना होणार आहे.

एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध वंचित घटकांना प्रवास सवलत देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रमुख्याने विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरिक सवलत, अंध-अपंगांना असलेली सवलत याचा राज्यातील लाखो घटकांना लाभ मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulmohar Mahotsav : साताऱ्यात १ मे रोजी साजरा केला जातोय गुलमोहर दिन; महोत्सवात तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग

Health Tips: रात्रीच्या जोवणामध्ये कारलं खाल्याने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Shrikant Shinde News | श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरे सभा घेणार का? शिवतिर्थावर खलबतं

Today's Marathi News Live : वर्ध्यातील वादळात मुळासकट संत्राची झाडे जमीनदोस्त

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT