Gulmohar Mahotsav : साताऱ्यात १ मे रोजी साजरा केला जातोय गुलमोहर दिन; महोत्सवात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

Satara News : गुलमोहर दिन म्हणजे चित्र, कविता, लेखन संगीताची मैफिल. हा कार्यक्रम कला अविषकारांचा संगम सातारामध्ये पहायला मिळतो. भारतातून वेगवेगळ्या भागातून कलाकार या महोत्सवात सहभागी होत असतात.
Gulmohar Mahotsav
Gulmohar MahotsavSaam TV

ओंकार कदम

1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आज राज्यभर साजरा केला जात आहे. असे असले तरी साताऱ्यात मात्र 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेल्या २५ वर्षांपासून साजरा केला जातो आहे. गुलमोहर दिन म्हणजे चित्र, कविता, लेखन संगीताची मैफिल. हा कार्यक्रम कला अविषकारांचा संगम सातारामध्ये पहायला मिळतो. भारतातून वेगवेगळ्या भागातून कलाकार या महोत्सवात सहभागी होत असतात.

Gulmohar Mahotsav
Maharshtra Politics: कराळे गुरुजी वर्धा लोकसभेच्या आखाड्यात? पुण्यात शरद पवारांची घेणार भेट

रखरखत्या उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला लाल, पिवळा गुलमोहर फुललेला पाहून मनाला एक प्रकारचा गारवाच मिळत असतो. उन्हाळ्यात ज्यावेळी सर्व झाडे कोमेजून जातात त्यावेळी मस्तपैकी वेगवेगळ्या रंगाने फुललेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेत असतो. हाच विचार घेवून साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली.

आज या गुलमोहर रंगोत्सवाचे २६ वे वर्ष आहे. लहान,मोठे सर्वजन साताऱ्यातील एका ठिकाणी जमून गुलमोहराचा झाडाची त्याचा फुलांची खूप छान छान चित्रे काढतात. यावेळी गाणी आणि कविता देखील म्हणल्या जातात. आज गुलमोहराची चित्रे रेखाटली गेली आणि काहींनी कविता,चारोळ्यासादर केल्या.

तसेच एकमेकांना गुलमोहर दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तर काही युवकांनी गुलमोहराच्या झाडाला पाणी घालून हा गुलमोहर दिन साजरा केला. गुलमोहर रंगोत्सव आता आणखी बहरू लागला आहे. या उत्सवात महारष्ट्रामधील कलाकार तर सहभागी होत आहेतच तर भारतातील छोटे मोठे कलाकार आपले कलाविष्कार सादर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एकही कलाकार येथे आपली कला सादर करताना कोणतंही मानधन घेत नाहीये.

आज राज्यभरात १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जात आहे. त्यात साताऱ्याच्या युवकांनी या गुलमोहर दिनाचा शोध लावल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. महाराष्ट्र दिनी गुलमोहर दिन साजरा केल्याने आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाबद्दल देखील मोहोत्सवात माहिती देण्यात आलीये.

Gulmohar Mahotsav
Parbhani Crime News : परभणी हादरलं! शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com