बातम्या

अखेर खडसेंचं ठरलं! येत्या 48 तासांत खडसे राष्ट्रवादीत जाणार - सूत्र

साम टीव्ही न्यूज

एकनाथ खडसे हे येत्या 48 तासांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलीय. दोन दिवस ते राज्याबाहेर असणार आहेत. त्यानंतर ते राज्यात परत आल्यावर याबाबत चर्चा करून 20 डिसेंबरपर्यंत त्यांचा प्रवेश सोहळा होईल असं त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येतंय. दरम्यान एकनाथ खडसे आज पुन्हा नागपुरात शरद पवारांची भेट घेणार असल्याचंही कळतंय.

खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

 भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपमध्ये डावलले जात असल्यामुळे नाराज असलेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गोपिनाथगडावरील कार्यक्रमात पक्ष नेतृत्वावर थेट टीका केली होती. या वेळी भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यामुळे आज नागपुरात झालेल्या खडसे - पवार भेटीला महत्त्वप्राप्त झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ आज सायंकाळी भाजपमधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही नागपुरात दाखल झाले. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

खडसेंच्या मुद्द्यावर प्रश्न विचारताच गिरीष महाजनांनी  काढला पळ

दरम्यान, खडसेंच्या प्रश्नावर गिरीष महाजनांनी मौन बाळगलंय. खडसेंच्या मुद्द्यावर प्रश्न विचारताच गिरीष महाजनांनी पळ काढला. आणि उत्तर देणं टाळलंय. त्यामुळे भाजपचे नेते हे खडसेंवर प्रतिक्रिया देणं टाळत असल्याचं अधोरेखित झालंय. भाजपला सातत्यानं घरचा आहेर देणाऱ्या खडसेंवर भाजपच्या इतर नेत्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. नेमकं गिरीष महाजनांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर देणं कसं टाळलं

सतत पक्षात डावलल्यानं खडसेंनी मार्ग बदलला

गेल्या चार वर्षांपासून भाजपमध्ये कोंडी होत असल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे कुठली भूमिका घेणार? कुठल्या पक्षात जाणार? याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. नुकतेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात खडसे यांनी खदखद व्यक्त केली नाही तर भाजप नेतृत्वात जोरदार प्रहार करीत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते. 

राज्यात ज्येष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याबाबतची माहिती देण्यास ते दिल्लीलाही जाऊन आले. परंतु, त्यांना विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गोपीनाथगडावरून "माझा भरवसा करू नका' असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच सांगितले. या पार्श्‍वभूमीवर आज ते नागपुरात दाखल होताच राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. पक्षाच्या आमदारांचा वर्ग घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सायंकाळी नागपुरात दाखल झाले. काही तासाच्या अंतराने एकनाथ खडसेही उपराजधानीत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राजकीय वर्तुळात त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सत्कार समारंभानिमित्त शरद पवार दिवसभर नागपुरात आहेत. खडसे उद्या त्यांच्यासोबत पुढील राजकीय वाटचालीबाबत खलबते करण्याची शक्‍यता आहे. राजकीय वर्तुळातील अंदाज खरे ठरल्यास खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश व्हाया नागपूर होणार आहे. 

Web Title: eknath khadse at nagpur, may enter in ncp

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Cyber Crime : व्यापाऱ्याची ६ लाखात फसवणूक; गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष

Juna Furniture Collection : महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची बॉक्स ऑफिसवर कमाल, पहिल्या विकेंडला कमावले कोट्यवधी रुपये

Bihar Accident News : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडीवर काळाचा घाला; भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

Stone Pelting In Mihir Kotecha Ralley: भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, मुंबईत वातावरण तापलं

International Workers Day: १ मेला 'कामगार दिन' का साजरा करतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT