माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिलाय.. आरोग्याच्या प्रश्नावर उपोषण करणार असल्याचं त्यांनी जळगावात सांगितलं. मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगाव इथल्या रुग्णालयात गेल्या ३ वर्षांपासून एकही डॉक्टर नाही. शासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करून ही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने खडसे आक्रमक झालेत..याठिकाणी 8 दिवसात जर डॉक्टर उपलब्ध झाले नाही, तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय..याबाबत त्यांनी आरोग्य संचालकांना पत्र पाठवलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.