बातम्या

पार्ले-जी बिस्कीटाची मागणी वाढली, अनेकांनी साठा केल्यानं बिस्कीटांचा तुटवडा

साम टीव्ही न्यूज

पारले जी शहरासोबतच आता ग्रामीण भागातही आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. पारले जी छोट्यातला छोटा बिस्किटाचा पुडाही मिळेनासा झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे सध्या पारले जी च्या कंपनीत 50 टक्के कर्मचारीच कार्यरत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी पारले जी पॅकिंगसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने पॅकेजिंगच्या अडचणी येत आहेत.

अनेकांनी बिस्किटांचा साठा करुन ठेवलाय यामुळेही सध्या बाजारात बिस्किटांचा तुटवडा जाणवत आहे. याआधीच पारले जी कंपनीकडून तीन कोटी बिस्किटे तीन आठवड्यात सरकारी एजन्सीला देण्यात येणार आहेत असं जाहीर केलं होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत होईल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पण मुंबई शहरासह आता ग्रामीण भागातही पारले जी मिळत नसल्याचं समोर आलंय. 

Web Title - marathi news Demand for Parle-G biscuits increased

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

SCROLL FOR NEXT