बातम्या

नाशकात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन हायअलर्टवर, ही मोठी घोषणा

साम टीव्ही न्यूज

मालेगावात आज दुपारपासून एकवीस तासांसाठी पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. शहरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या आणि आजच्या शब-ए-बारात सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आळाय.  या लॉकडाऊनदरम्यान केवळ मेडिकल, हॉस्पिटल, फळ आणि ड्रायफ्रुटची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून. किराणा दुकानं, पेट्रोलपंप आणि भाजीपाला या अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहे.

मुस्लिम बांधवांनी शब-ए-बारातची नमाज पठण करण्यासाठी कब्रस्तान अथवा मशिदींमध्ये गर्दी करू नये,  घरातूनचं शब-ए-बारातचे धार्मिक विधी पार पाडावेत असं आवाहन, प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मालेगावातील अनेक भाग प्रशासनानं सील .केलेत. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय.

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय..जिल्ह्यातील मालेगावात एकाचवेळी पाच करोनाबाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरलंय. कोरोनामुळे याठिकाणी ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून तो सौदीला प्रवास करुन आला होता..दरम्यान नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या  वाढल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे.. तर मालेगावात एकाच दिवसात कोरोनाचे ५ रुग्ण आढळल्याने मालेगावच्या सीमा सील करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात.

Web Title - marathi news  Corona's outbreak in Nashk increased, with administration hierarchs

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT