बातम्या

मुख्यमंत्र्यांनी नाणार संदर्भात समितीला भेट नाकारली

सकाळ न्यूज नेटवर्क

रत्नागिरी/मुंबई - नाणार रिफायनरी विरोधातील कृती समितीने या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली होती. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृती समितीशी भेट घेण्यास नकार दिला. यामुळे कृती समितीने नाणार संदर्भातील अद्यादेश मागे घेईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोकणात प्रस्तावित नाणार रिफायनरी विरोधात आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या हद्दीतील सुमारे चार हजारावर ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी भूसंपादन अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील फाईल देऊन ६ महिने झाले तरी अजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यासाठीच कृती समितीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती पण समितीला भेट नाकारण्यात आली.

दरम्यान काल दिवसभरात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या ठिकाणी मंचावर येऊन पाठिंबा देण्याचे जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमान, शेतकरी स्वाभिमानी संघटना , अखिल भारतीय काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आंदोलनास पाठींबा दिला आहे.

मनसेचे नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, सतीश नारकर, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, काँग्रेसचे हूसँबानो खलिफे, हरीश रोग्ये, अविनाश लाड, भाई जगताप, स्वाभिमानचे आमदार नितेश राणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्र्यांची भेट पाहिजे म्हणून अजूनही ग्रामस्थ आझाद मैदानात थांबून आहेत. मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांना भेटा म्हणून सांगत होते, पण ग्रामस्थांनी उद्योगमंत्र्यांना भेटण्यास नकार देऊन मैदानातच ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देत नाहीत तोपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

SCROLL FOR NEXT