बातम्या

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला झटका

सकाळ न्यूज नेटवर्क

लोकसभा निकाल 2019 :  कोलकाता : पाच वर्षांपूर्वी ज्या राज्यात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या, त्याच राज्यात त्यांनी यंदा तब्बल 18 जागांवर आघाडी मिळविली आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला त्यांच्याच राज्यात जोरदार दणका बसला आहे. तृणमूलचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहेत. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कमालीचे वाकयुद्ध झाले होते. बॅनर्जी आणि मोदी-अमित शहा-योगी आदित्यनाथ यांच्यातील शाब्दिक चकमकी संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. इतकेच नव्हे, तर अमित शहा यांच्या रोड शोमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. यावरूनही राजकीय रण पेटले होते. 

2014 च्या निवडणुकीमध्ये तृणमूल कॉंग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला चार, तर भाजप आणि डाव्या पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे तृणमूलच्या जागा 34 वरून 23 जागांपर्यंत खाली आल्या आहेत. 

Web Title: BJP wins big in West Bengal as Mamata Banerjee suffers loss in Lok Sabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Today's Marathi News Live : नवी मुंबईत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT