बातम्या

(( BLOG )) #CWC19 : हा तर तेजतर्रार स्टार्क - शैलेश नागवेकर

सकाळ न्यूज नेटवर्क

वर्ल्ड कप 2019 : ताशी 150 कि.मी वेगात चेंडू रूपी क्षेपणास्त्र टाकणारा ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार गोलंदाज मिशेल स्टार्कने गुरुवारी झालेल्या बांगलागेशविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट मिळवले आणि विश्वकंरडक क्रिकेट स्पर्धेत सलग 14 सामन्यात किमान एक तरी विकेट मिळवण्याचा  विक्रम केला. त्यांच्याच देशात गतवेळच्या विश्वकरंडक स्पर्धेत 22 विकेट मिळवून तो सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

त्याचा हाच फॉर्म या स्पर्धेतही कामय आहे. यंदा ऑस्ट्रेलियाच्या सहाही सामन्यात त्याने विकेट मिळवले आहे त्यामुळे त्याचा धोका यंदाही कायम आहे. भारताविरुद्ध त्याने विकेट मिळवली परंतु पराभव टाळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे त्यामुळे उपांत्य आणि तो सामना जिंकल्यास अंतिम सामना अशा निर्णायक सामन्यात तो भारी ठरू शकतो.

विश्वकरंडक स्पर्धेत हमखास यशस्वी ठरणारे किंबहूना सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पुढे आहे. सलग 12 सामन्यात किमान एक तरी विकेट मिळवणारे 11 गोलंदाज आहे यामध्ये पाच (स्टार्क, ग्लेन मॅकग्रा, डॅमियन फ्लेमिंग, ब्रेट ली) ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आहेत ग्लेन मॅकग्राने तर दोनदा हा पराक्रम केला आहे.

झहीर खानही यादीत
सलग विकेट मिळवणाऱ्या सर्वोत्तम गोलंदाज आपला झहीर खानही आहे. त्याने 12 सामन्यात विकेट मिळवल्या आहेत 2007-2011 या स्पर्धांत त्याने ही कामगिरी केली. 2011 मध्ये भारत चॅम्पियन ठरला होता.

-14 मिशेल स्टार्क
-13 ग्लेन मॅकग्रा
-12 इम्रान खान
-12 रॉजर हार्पर
-12 डॅमियन फ्लेमिंग
-12 ग्लेन मॅकग्रा
-12 ब्रेट ली
-12 चमिंडा वास
-12 टेंट्र जॉन्सन
-12 झहीर खान
-12 टीम साऊदी
-12 मॉर्नी मॉर्कल

Web Title: Marathi news australia bowler Mitchell starc fastest delivery In criclet World Cup

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT