बातम्या

रावसाहेब दानवे रुग्णालयात दाखल, अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : प्रचाराच्या धामधुमीत वाढत्या उन्हाचा फटका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बसला. यामुळे त्यांना सोमवारी (ता. 8) शहरातील शहानुरमिया दर्गा जवळील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याना दोन ते तीन दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. दरम्यान मंगळवारी (ता. 9) काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवेंची भेट घेत चर्चा केली. 

नांदेड येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, तसेच जालना मतदार संघातील दौरे, सभा बैठकांच्या धावपळीमुळे दानवे यांना वाढत्या उन्हाचा फटका बसला. यामुळे त्यांना सोमवारी दुपारी शहानुरमिया दर्गा रोडवरील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांना धावपळीमुळे त्रास झाल्यामुळे त्यांना एक किंवा दोन दिवस सक्‍तीचा आराम करण्याचे डॉक्‍टरांनी सल्ला दिला आहे. यामुळे मंगळवारी (ता. 9) औसा, लातूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभेसही दानवे यांना जाता आले नाही. एक ते दोन दिवसानंतर ते पुन्हा प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी दिली. 

काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मिळाल्यामुळे नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. 3 एप्रिलला रात्री साडे दहा वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी एका विशेष विमानाने मुंबईपर्यंत प्रवास केला होता. त्यावेळी सत्तार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चाही झाली होती. मात्र दानवे आणि सत्तार यांनी भाजप प्रवेशाबाबत नकार दिला. या भेटीनंतर मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पुन्हा अब्दुल सत्तार यांनी शहानुरमिया दर्गा जवळील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेले असलेल्या रावसाहेब दानवे यांची भेट घेत विचारपूस केली. एक तासभर अब्दुल सत्तार दानवे जवळ होते. यावेळी निवडणुकीविषयीही चर्चा झाल्याची माहिती या दोघांत झाली. रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहे. ते उपचार घेत असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे सत्तार यांनी सांगितले. 

माझे मित्र रावसाहेब दानवे हे आजारी असल्याचे कळल्यामुळे त्यांची विचारपुस करण्यासाठी त्याची भेट घेतली आहे. लवकरच ते बरे होऊन प्रचाराच्या कामाला लागतील. 
- आमदार अब्दुल सत्तार

Web Title: Abdul Sattar meets unwell Raosaheb Danavane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

SCROLL FOR NEXT