बातम्या

कलम 377 वर न्यायालयानेच निर्णय घ्यावा : केंद्र सरकार

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : समलैंगिक संबंधाविषयीचे कलम 377 वर सर्वोच्च न्यायालयात काल (मंगळवार) सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर आता केंद्र सरकारने कलम 377 वर न्यायालयानेच निर्णय घ्यावा, असे सांगितले. समलैंगिकतेतील संबंधाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

याबाबत केंद्र सरकारने 'अॅडिशनल सॉलिसिटर जनरल' तुषार मेहता यांच्यावतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये सांगितले, की ''कलम 377 वर आता न्यायालयानेच निर्णय घ्यावा. आम्ही याबाबतचा संपूर्ण निर्णय न्यायालयाकडे सोपविला आहे''. भारताच्या सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज (बुधवार) सांगितले, की दोन प्रौढ लोकांनी 'अनैसर्गिक शरीरसंबंध' ठेवले तर त्यांना कोणत्याही खटल्यात जबाबदार धरले जाणार नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत काल स्पष्ट केले होते, की भारतीय दंडविधान कलम 377 याची गरज आहे का, याबाबत न्यायालय विचार करणार आहे. मात्र, याशिवाय अन्य कोणत्याही बाबींवर विचार केला जाणार नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

Special Report : 'ठाकरेंकडून संभाजीराजेंचा अपमान', व्हिडीओ दाखवत Uday Samant यांचा दावा

Special Report : Raj Thackeray आणि Narendra Modi एकाच मंचावर? शिवाजी पार्कात प्रचारसभा?

Special Report : अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला! हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT