बातम्या

'बीग बी' झळकणार मराठी चित्रपटात; 20 मेपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार सुरुवात

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार आहे. तेथे अमिताभ बच्चन चित्रीकरणात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे; तर त्यांच्या मित्राची भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. 

यापूर्वी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी "अक्का' या मराठी चित्रपटातील एका गाण्यात सहभाग घेतला होता. अमिताभ बच्चन यांचे पर्सनल मेकअपमन दीपक सावंत यांनी हा चित्रपट बनविला होता. त्यानंतर त्यांनी "विहीर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने विविध पुरस्कार सोहळ्यात बक्षिसे मिळविली होती. उमेश कुलकर्णीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. गिरीश कुलकर्णीने हा चित्रपट लिहिला होता. आता मिलिंद लेले दिग्दर्शित करीत असलेल्या एबी आणि सीडी या चित्रपटात अमिताभ बच्चन काम करणार आहेत. हा चित्रपट हेमंत एदलाबादकर यांनी लिहिला आहे. चंद्रकांत देशपांडे ही मुख्य व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे आणि ती विक्रम गोखले साकारीत आहेत. चंद्रकांत देशपांडे अर्थात सीडी हे निवृत्त चित्रकलेचे शिक्षक असतात. एका वळणावर त्यांना कळते की अमिताभ बच्चन हे आपले वर्गमित्र आहेत आणि त्यानंतर सीडीच्या जीवनात काय कायापालट होतो अशी साधारण ही कथा आहे. कथा-पटकथा व संवाद हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहेत. ते म्हणाले, की विक्रम गोखले, मिलिंद लेले आणि मी आम्ही तिघे जण बच्चन यांना भेटलो. त्यांना चित्रपटाची संपूर्ण कथा ऐकविली आणि त्यांनी विचार करूनच आम्हाला होकार दिला. त्यांना ही कथा खूप आवडली आहे. 

दिग्दर्शक मिलिंद लेले म्हणाले, "अमिताभ बच्चन विशेष महत्त्वपूर्ण भूमिका साकारीत आहे. एका वेगळ्या विषयावरील चित्रपटासाठी त्यांनी होकार दिला त्याकरिता मी त्यांचा आभारी आहे. हा हलकाफुलका कौटुंबिक चित्रपट आहे. अन्य कलाकार कोण असतील हे निश्‍चित व्हायचे आहे. मुंबई आणि पुण्यात चित्रीकरण करणार आहे. दोन गाणी या चित्रपटात आहेत.

Web Title: marathi news amitabh bachchan to work in marathi cinema shooting will start from 20th may

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात; अहमदनगरमध्ये आज ३ सभा घेणार

KL Rahul Statement: 'इथेच आमची चूक झाली...' सामना गमावल्यानंतर KL Rahul ने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Leg Pain: रात्री झोपताना पाय दुखतात? 'या' उपायांनी होईल फायदा

Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

SCROLL FOR NEXT